Corona Vaccination: मुंबईत लसींचा तुटवडा, नागरिक लसीकरणापासून वंचित

corona Vaccination
corona Vaccinationsakal media

मुंबई : मुंबईत (Mumbai) लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणामध्ये (Corona Vaccines) सातत्याने खंड पडत आहे. लाखाे मुंबईकर सध्या लसीकरणापासून वंचित असून दुसरीकडे, पहिला डाेस घेतलेल्या नागरिकांना अद्यापही दुसरा डाेस (Vaccine Dose) मिळालेला नाही. त्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम (Vaccination Drive) लांबणार असून लसीकरण पूर्ण व्हायला पुढील एक वर्ष लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( Mumbai vaccination Drive problems due to less corona vaccines-nss91)

मुंबईत निम्मे लसीकरण झाले असून अजून 50 टक्के मुंबईकर लसीकरणापासून वंचित आहेत. पालिका आराेग्य विभागाच्या मते, दुसरा डाेस केवळ 15,13,126 जणांना मिळाला आहे तर पहिला डाेस 50 लाख 54 हजार 198 नागरिकांना मिळाला आहे. या आकडेवारीनुसार, अद्याप 50 टक्के मुंबईकर लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीचा मुबलक साठा मिळावा, यासाठी केंद्रिय आराेग्य विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही मुबलक साठा आला नसल्याने आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. साधारणता 50 लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण बाकी असून लसीकरणाचा सध्याचा वेग पाहता पुढील एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.

corona Vaccination
Mumbai Rain : मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, पण...

दुसऱ्या डाेससाठी लसीकरण केंद्राबाहेर पहाटेपासून लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. पण लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागत आहे. 31 मे 2021 पर्यंत मुंबईतील नागरिकांचे लसीकरण पूर्ण हाेईल असे आराेग्य विभागाने सांगितले हाेते. लसींच्या तुटवड्यामुळे आराेग्य विभागाला शक्य झाले नाही. दुसरीकडे, तिसरी लाटेपूर्वी 70 टक्के मुंबईकरांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे टास्क फाेर्सने सूचना केली. पण लसीचा अपुऱ्या साठ्यामुळे आराेग्य विभागसमाेर आता लसीकरण पूर्ण कसे करायचे असे आव्हान उभं ठाकलं आहे.

16 जानेवारी 2021 राेजी संपूर्ण राज्यात लसीकरण अभियान सुरु झाले. फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत लसीकरण मोहीम सुरळीत सुरु हाेती, पण त्यानंतर लसींचा तुटवडा भासू लागला आणि लसीकरण माेहिमेत खंड पडण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान, पालिकेने 18 , 45 वर्ष व 60 वर्षावरील नागरिक, गराेदर महिला आणि आता अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना लसीकरण अशा टप्प्या-टप्प्याने माेहिम हाती घेतली. पण लसींच्या अभावी माेहिमेत अनेक अडचणी येत आहेत. आतापर्यंत 65,67,324 नागरिकांना पहिला व दुसरा डाेस देण्यात आला आहे. तर 7,06,558 फ्रंट लाईन व हेल्थकेअर वर्कर्सचे लसीकरण झाले असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com