Mumbai|14500 हून अधिक सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai|14500 हून अधिक सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण

मुंबई : मुंबईतील 14 हजारांहून अधिक सोसायट्यांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे. मुंबईत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने लसीकरण मोहीम सुरू केली. त्यासोबतच लसीकरणा संदर्भात जनजागृती करण्यासाठी 100 टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यावर पोस्टर लावणे सुरू केले. यातून मुंबईमधील तब्बल 14500 हजारांहून अधिक 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, ख्रिसमस आणि नवीन वर्षात मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यता काकाणी यांनी व्यक्त केली आहे. 

महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने सुरू केली असून मुंबईत पहिला डोस 100 पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.  नागरिकांमध्ये लसीकरणाचे महत्व वाढावे म्हणून ज्या सोसायटीमधील 100 टक्के रहिवाशांनी लस घेतली आहे. अशा सोसायट्यांवर 100 टक्के लसीकरण झाल्याचे पोस्टर पालिकेकडून लावले जात आहेत. मुंबईत एकूण सुमारे 37 हजार सोसायट्या असून त्यापैकी 22 हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 14 हजार 500 सोसायटीमधील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. 

हेही वाचा: मुंबई : विशेष मोहिमे अंतर्गत 55 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले होते. याच दरम्यान गणेशोत्सव, नवरात्री आदी सण साजरे केले. यादरम्यान रुग्णसंख्या वाढलेली नाही. 300 ते 400 च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. दिवाळीनंतर पुढच्या काही दिवसांत रुग्ण संख्येत भर पडेल असाही अंदाज आहे. त्यातच येत्या काही दिवसात  ख्रिसमस आदी सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी खरेदीसाठी बाजारात ही मोठ्या प्रमाणात गर्दी होते यामुळे डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढू शकते अशी भीती काकाणी यांनी व्यक्त केली आहे. पण, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले तर तिसरी लाट टाळता येऊ शकेल असेही काकाणी यांनी सांगितले.

loading image
go to top