esakal | मुंबईत पाणी तुंबण्याची व्यथा मांडली गणपती देखाव्यातून
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati decorations

मुंबईत पाणी तुंबण्याची व्यथा मांडली गणपती देखाव्यातून

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : दरवर्षी मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात पावसाच्या संततधारा सुरू झाल्या की, पाणी तुंबण्याची (water logging) घटना घडते. दरवर्षीच्या या दुखण्याला मुंबईकरांनी सहन केल्याने याची सवय झाली आहे. मात्र, ही स्थिती बदलण्यासाठी कितीही पाऊस पडला तरी, मुंबईत पाणी साचण्याची घटना होऊ नये, यासाठी गणेशभक्तांकडून (Ganesha devotees) हिंदमाता परिसरातील (hindmata) पूरपरिस्थितीचे दृश्य गणपती देखाव्यातून (Ganpati decorations) मांडले आहे. सर्व नागरिकांकडून या देखाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

शीव येथील प्रतिक्षा नगरमधील कला दिग्दर्शक फ्रॅंकलीन पाॅल याने हिंदमाता परिसरातील पूरस्थितीचे वास्तववादी गणपती देखावा तयार केला आहे. देखाव्यात तुंबलेल्या पाण्यात झाडांच्या फांदीवर गणराय विराजमान झाले आहेत. तर, बाजूला हिंदमाता बसथांबा, या बस थांब्यावर 'मास्क नाही, प्रवेश नाही' उद्घोषणा, प्रतिक्षा नगर आगारात जाणारी बस, पाण्यात अडकलेल्या चारचाकी गाड्या, पूल, इमारती याचे दृश्य दाखविले आहे.

मागील 27 वर्षांपासून पाॅल यांच्या घरी गणपती विराजमान होत आहेत. परंतु, मागील चार वर्षापासून सामाजिक जनजागृतीचे संदेश देणारा देखावा तयार केला जात आहे. या गणपतीला 'पॉलचा राजा' असे नाव देण्यात आले आहे. मागील वर्षी ग्रामपंचायतमधील कामकाज, शेतीचे दृश्य, कोरोना नियमांचे पालन करण्याचे दृश्य देखाव्यातून दाखविण्यात आले होते.

पाॅल सांगतो की, मी आणि माझ्या टिमद्वारे दरवर्षी समाजात प्रबोधन करणारे देखावे तयार करण्यावर भर असतो. समाजात अनेक बाबी आहेत. ज्या चुकीच्या आहेत, मात्र, आपण त्याची सवय लावून त्या अंगवळणी केल्या आहेत. परंतु या वाईटबाबी झटकून काढल्या पाहिजेत. चुकीच्या गोष्टीबाबत आवाज उठविला पाहिजे व त्या सुधारल्या पाहिजेत. त्यामुळे हिंदमाता येथे दरवर्षी पूरस्थितीवर कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. हा बंदोबस्त होण्यासाठी मार्मिक देखावा तयार केला आहे.

loading image
go to top