३०० दिवस पुरेल इतका पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. महिनाभरातील पावसामुळे सर्व तलावांत एकूण ७८.०८ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे ३०० दिवस पुरेल, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. महिनाभरातील पावसामुळे सर्व तलावांत एकूण ७८.०८ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना सुमारे ३०० दिवस पुरेल, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली.

जूनच्या अखेरीला विश्रांती घेतलेल्या पावसाने काही दिवसांपासून तलावांच्या क्षेत्रात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे महिनाभरातच तलावांतील पाणीसाठा ७८.०८ टक्‍क्‍यांवर गेला आहे. मुंबईकरांची वर्षभर तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. सध्याचा जलसाठा ध्यानात घेतल्यास आणखी तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे. तलाव क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास काही दिवसांत मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होऊ शकेल, असा विश्‍वास महापालिकेच्या जल अभियंता विभागाने व्यक्त केला. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, तानसा आणि मोडक सागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Water Storage for 300 days rain