
Mumbai Water Supply : मानखुर्द, गोवंडीत उद्या पाणी नाही
मुंबई - मुंबईतील पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी काही भागात पालिकेने जलवाहिन्यांची कामे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रॉम्बे येथील जलाशयाच्या इन लेट व्हॉल्व्ह बदलण्याचे काम पालिकेकडून केले जाणार आहे.
या कामामुळे मानखुर्द, गोवंडी परिसरात ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रहिवाशांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून ट्रॉम्बे जलाशय येथे दुरुस्तीचे काम सकाळी हाती घेतले जाणार असून २४ तासांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार म्युनिसिपल कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई कॉलनी , जॉन्सन जेकब रोड (ए,बी,आय,एफ सेक्टर), एसपीपीएल इमारत, म्हाडा इमारत, महाराष्ट्र नगर, देवनार गाव मार्ग, गोवंडी गाव, व्ही-एन पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग,
दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदिर रोड, पायली पाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी कॉलनी गौतम नगर, पांजरापोळ या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून या कालावधीत पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.