मुंबईत निरभ्र आकाश, पुढच्या ४८ तास अनुभवयाला मिळणार विहंगम दृश्य

मुंबईत निरभ्र आकाश, पुढच्या ४८ तास अनुभवयाला मिळणार विहंगम दृश्य

मुंबई: आज सकाळपासून मुंबईत निरभ्र आकाश दिसत आहे. निळ्याशार रंगांची चादर ओढून घेतल्याचे मनमोहक दृश्य अनुभवास मिळत आहे. हे विहंगम दृश्य पुढील 48 तासांसाठी कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई आणि उपनगरातील किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 18 अंश सेल्सियस इतकी नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस हे वातावरण असेच राहण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत एकेरी आकड्यावर तापमान आल्याचे थंडीचा जोर वाढताना दिसतोय. मुंबईत देखील थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत पुढील दोन दिवस कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यात पुढील दिवशी किंचित वाढ होईल.   आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत विचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात किंचित घट झाली आहे. त्यामुळे त्या भागात काहीशी थंडी जाणवू लागली आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान आणखी खाली घसरले आहे. 

राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी युनि. 5.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील 24  डिसेंबरपर्यंत मुंबईस संपूर्ण राज्यात आणि गोव्यात दिवसा हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून रात्री थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह राज्यातले आज सकाळी नोंदवलेले किमान तापमान

मुंबई (कुलाबा) 18,परभणी युनि. 5.6,परभणी  8.1 , गोंदिया 7 , नागपूर 8.4 ,वर्धा 9.8 ,अकोला 9.6 ,पुणे 9.2 ,नाशिक 9.1 , औरंगाबाद 9.5 ,बारामती 9.2 ,जळगाव 10.5 , मालेगाव 10.8 , नांदेड  11 ,Mwr 11.5 जालना 12 ,अमरावती 11.1 ,बुलडाणा 11.4 ,चंद्रपूर 10 ,ब्रह्मापुरी 10.3 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai weather blue sky continue next 48 hours Regional Meteorological Department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com