पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; पती अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

woman suicide

गोवंडी येथील विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

Women Suicide : पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; पती अटकेत

मुंबई - गोवंडी येथील विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी पती इफ्तार अहमद याला देवनार पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडीत हीना अहमद या गृहिणीने 9 फेब्रुवारी रोजी दुपारी आत्महत्या केली होती.

याप्रकरणी 10 फेब्रुवारी रोजी देवनार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपीने महिलेने पतीच्या जाचातून आत्महत्या केल्याचे समोर आले. पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि त्याला अटक झाली. या प्रकरणात मृत हिना यांच्या आईकडून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली होती.

मृत हीना हिचा विवाह इफ्तार अहमदशी 6 महिन्यापूर्वी झाला होता, फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार हिना हिचा पती हिना ला वारंवार मारहाण करते असे. हिना ला तिच्या माहेरी जावून देत नसत तसेच तिला घरातुन बाहेर पडण्यास अटकावं करत असे.

अखेर पतीच्या जाचाला कंटाळून हिनाने 9 फेब्रुवारी रोजी आपले जीवन संपवले. आरोपी पतीने हिनास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे सांगण्यात येत आहे . या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.