विदेशी पिस्तुलासह तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - विदेशी पिस्तूल घेऊन बिहारहून मुंबईत आलेल्या तरुणाला अंबोली पोलिसांनी नुकतीच अटक केली. राजेश मनीपाल शाह असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत. राजेश काही दिवसांपूर्वी बिहारला गेला होता. त्याने तेथील मोतीहारी परिसरातून एक अत्याधुनिक पिस्तूल आणि दोन काडतुसे आणली होती. पिस्तुलाची विक्री मुंबईत केल्यास जास्त पैसे मिळतील, असे वाटल्याने तो सोमवारी (ता. 5) अंधेरी परिसरात आला होता. याची माहिती पोलिस उपनिरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. पोलिसांनी वीरा देसाई मार्ग परिसरात सापळा रचला आणि त्याला अटक केली.
Web Title: mumbai youth arrested with foreign gun