दुसऱ्या एसी लोकलची प्रतीक्षा कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मुंबईकरांना दुसऱ्या एसी लोकलसाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता आहे. या लोकलमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून पावसाळ्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे, असे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई - मुंबईकरांना दुसऱ्या एसी लोकलसाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्‍यता आहे. या लोकलमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून पावसाळ्यानंतर तिची चाचणी घेण्यात येणार आहे, असे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दुसरी एसी लोकल वर्षाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्‍यता आहे. 

पहिली लोकल 31 मार्च 2017 रोजी चेन्नईत तयार झाली होती. त्यानंतर ती मुंबईत आणण्यात आली. 2017 पासून दुसऱ्या लोकलचे काम सुरू आहे; मात्र अजूनही लोकल तयार नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसरी एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार होती. "आयसीएफ'चे तत्कालीन महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती; मात्र ते निवृत्त झाल्यानंतर या लोकलचे काम रखडले आहे. एसी लोकलचे मेट्रोशी साधर्म्य असून प्रवासी क्षमताही वाढवण्यात आली आहे, तसेच प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या यंत्रणेवरही काम सुरू आहे. मुंबईत तांत्रिक बिघाड आणि एसी प्रणालीमुळे ही लोकल सतत चर्चेत राहिली आहे. 

एसी प्रणालीमध्ये सुधारणा 
दुसऱ्या एसी लोकलमध्ये तांत्रिक आणि एसी प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. एसी लोकलच्या दरवाजांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार या लोकलचे दरवाजे बंद होण्यासाठी पहिल्या लोकलपेक्षा कमी वेळ घेणार आहेत. तसेच उत्तम दर्जाचे आसन आणि आधुनिक ब्रेकिंग सिस्टम असणार आहे. 

Web Title: mumbaikar Waiting for the second AC locale

टॅग्स