मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही; ठाणे, पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा

तुषार सोनवणे
Wednesday, 23 September 2020

मुंबईकरांची चिंता आणखी वाढणार असून प्रशासनालाही अलर्ट रहावं लागणार आहे.

मुंबई - मुंबईत मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे जनजीनवन विस्कळीत झाले आहे. त्यानंतरही मुंबई आणि किनारपट्टी परिसरात पुढचे 24 पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची चिंता आणखी वाढणार असून प्रशासनालाही अलर्ट रहावं लागणार आहे.

नवी मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अवघ्या सात तासांत 210 mm पावसाची नोंद 

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यात पुन्हा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढचे तीन दिवस मुंबईतील पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. भल्यापहाटे झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांच्या प्रवासाचे हाल झाले. लोकल आणि इतर सार्वजनिक सेवा ठप्प झाली होती. नागरिकांच्या दूकानात आणि घरांमध्ये पाणी गेले होते.

 मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना पावसाचा फटका; नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालयात पाणीच पाणी, ओपीडीमध्ये रुग्णांचे हाल 

भल्या पहाटे झालेल्या मुसळधार पावसानंतर भारतीय हवामान खात्याने आता ठाणे पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज मुंबईत झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापने, बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. पुन्हा हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रशासन काय पावले उचलानार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars rains continue Extreme levels of rainfall are expected in Thane and Palghar districts