esakal | मुंबईकरांनो...पाऊल सांभाळून टाका! कोरोनामुळे रस्ते,पदपथ आणि पुलांच्या दुरूस्तीला कात्री
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो...पाऊल सांभाळून टाका! कोरोनामुळे रस्ते,पदपथ आणि पुलांच्या दुरूस्तीला कात्री

कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे मुंबई महानगर पालिकेने अर्थसंकल्पालातील विकास कामांना 2 हजार 500 कोटी रुपयांनी कात्री लावली आहे.यात पदपथांच्या दुरुस्तीचे 44 कोटी आणि रस्ते पुल आणि वाहतुक विभागाचा निधी 400 कोटी रुपयांनी कापण्यात आला आहे. 

मुंबईकरांनो...पाऊल सांभाळून टाका! कोरोनामुळे रस्ते,पदपथ आणि पुलांच्या दुरूस्तीला कात्री

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई : कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे मुंबई महानगर पालिकेने अर्थसंकल्पालातील विकास कामांना 2 हजार 500 कोटी रुपयांनी कात्री लावली आहे.यात पदपथांच्या दुरुस्तीचे 44 कोटी आणि रस्ते पुल आणि वाहतुक विभागाचा निधी 400 कोटी रुपयांनी कापण्यात आला आहे. 

टॉसिलीझुमॅबचा औषधाच्या वापराबाबत राज्य टास्क फोर्सचे रूग्णालयांना निर्देश; अपेक्षित परिणाम साधत नसल्याचे स्पष्ट

मुंबई महानगर पालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती पुढे मांडलेल्या अर्थसंकल्पात रस्ते,वाहतुक पुल विभागासाठी 2 हजार 699 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.तर,या महिन्यात महासभेत मंजूर करण्यात आलेल्या सुधारीत अर्थसंकल्पात यात 400 कोटींची कपात करण्यात आली.यातील सर्वाधिक निधी हा जंक्‍शनच्या दुरुस्तीचा आहे.जंक्‍शनच्या दुरुस्तीच्या कपातील 125  कोटी रुपये कापण्यात आले आहे.तर,पदपथ दुरुस्तीसाठी यंदा 50 कोटी रुपयांची तरतूद केली होती.त्यात तब्बल 44 कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.महानगर पालिकेने गेल्या वर्षी पदपथांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी जीवक रोबोट दाखल; डॉक्टरांचाही धोका होणार कमी

महत्वाच्या प्रकल्पांचे पैसे कापलेले असताना नगरसेवकांना भरभरुन निधी दिला आहे.नगरसेवकांनी सुचवलेल्या कामासाठी तब्बल 840 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.रस्ते दुरुस्ती,पदपथ दुरुस्ती सारख्या महत्वाच्या कामांच्या निधीत कपा बद्दल समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पदपथ ही मुंबईसारख्या शहरातील महत्वाची गरज आहे.सात कोटीत मुंबईचे पदपथ कसे दुरुस्त होतील असा प्रश्‍नाही ते उपस्थीत करतात.त्याच बरोबर फक्त प्रकल्पांवर होणाऱ्या खर्चात कपात का करता सर्व प्रकारच्या खर्चात कपात करणे गरजेचे असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक मालवाहतूकदारांना दिलासा; राज्यसरकारकडून 700 कोटींची करमाफी

पावसाळ्यात पदपथ खराब होता.लॉकडाऊन संपल्यानंतर वाहानांची संख्या वाढेल.तसेच पादचार्यांची वर्दळच वाढेल.अशा पदपथावरुन चालणे अवघड होईल.अशी तक्रार मंगेश लोलगे यांनी नोंदवली.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top