Kishori Pednekar : "१३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp navneet rana demands removal of amravati commissioner aarti singh
Kishori Pednekar : "१३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही"

Kishori Pednekar : "१३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही"

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. तू ठाकरे असशील तर मीही राणा आहे, असं आव्हान त्यांनी दिलं होतं. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी राणांवर प्रतिक्रिया दिली आहे.

किशोरी पेडणेकर आज माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेकांवर टीका केली. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी नवनीत राणांविषयी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांना मधूनच तोडत पेडणेकर म्हणाल्या की, मी काहीही बोलणार नाही. १३ व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलेल्या मुलीवर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही.

हेही वाचा: Kishori Pednekar: "नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं"

नवनीत राणांनी चार पाच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. जळगावमधल्या एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, ठाकरेंना वाटलं होतं की जेलमधून बाहेर आल्यावर मी घाबरुन बसेन. मी जेलमध्ये १२-१२ तास हनुमान चालिसा पठण करत होते. मी म्हणाले होते की माझ्या भक्तीमध्ये थोडी जरी शक्ती असेल तरी मी उद्धव ठाकरेंना त्यांची खरी जागा दाखवेन. आज तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे एवढा गर्व करत होते, आज त्यांच्या घरात त्यांच्या बाजूने उभा राहणारा कोणी कार्यकर्ता शिल्लक नाही.

मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. मी इतकी दुर्बल नाही. जर तू शिवसेनेचा आहे, ठाकरे आहेस तर मीही राणा आहे, असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं.

Web Title: Mumbais Former Mayor Kishori Pednekar On Navneet Rana Shivsena

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..