मुंबईची विजेची वाढती गरज सौरऊर्जेतून भागवणे शक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

मुंबई - मुंबईची अर्धी विजेची गरज सौरऊर्जेतून भागवणे शक्‍य असल्याचा निष्कर्ष आयआयटी मुंबईच्या अहवालात काढण्यात आला आहे. 

"मिनिस्ट्री ऑफ न्यू एण्ड रिन्युएबल एनर्जी'चे (एमएनआरई) सचिव राजीव कपूर यांनी या अहवालाचे प्रकाशन आज आयआयटी मुंबईत केले. मुंबईत छतावरील सौरऊर्जानिर्मितीची क्षमता निवासी संकुलाच्या ठिकाणी सर्वाधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. छतावरील सौरऊर्जानिर्मितीच्या क्षमतेचा प्राथमिक अभ्यास आयआयटीसह अन्य काही संस्थांनी केला आहे. 

सौर वीजनिर्मितीची मुंबईची क्षमता 1720 मेगावॉट आहे. छतावरील सौरऊर्जानिर्मितीतून निवासी वसाहतींमध्ये 1.3 मेगावॉट विजेची निर्मिती करणे शक्‍य आहे; तसेच एकूण 75 टक्के ऊर्जेची निर्मिती गृहवसाहतींमध्ये करणे शक्‍य असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये सौरऊर्जानिर्मितीतून 223 मेगावॉट एवढी वीज मिळू शकते; तर वाणिज्यिक इमारतींमध्ये 56 मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता आहे; तसेच मुंबईतील लोकल सेवेसाठी 26 मेगावॉट आणि बसडेपोच्या ठिकाणी सौरऊर्जेतून 26 मेगावॉट वीजनिर्मिती करता येईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

शहरात छतावरील सौरऊर्जानिर्मितीच्या शक्‍यतेचा अभ्यास करण्यासाठी जीआयएस मॅपिंग, थ्री डी मॅपिंग यासारख्या पद्धतींचा वापर करण्यात आला. मुंबईची विजेची मागणी सकाळी 250 मेगावॉट ते 325 मेगावॉट इतकी असते; तर तिची दिवसभरातील सरासरी तीन हजार मेगावॉटपर्यंत जाते. छतावरील सौरऊर्जा पॅनेलद्वारे विजेची ही वाढती गरज भागवणे शक्‍य असल्याचा निष्कर्ष अहवालात आहे. 

120 विद्यार्थ्यांचे संशोधन 
हा अहवाल तयार करण्याचे काम आयआयटी मुंबईची "नॅशनल सेंटर फॉर फोटोवोल्टॅइक रिसर्च अँड एज्युकेशन', "सेंटर फॉर अर्बन सायन्स अँड इंजिनिअरिंग,' "ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन' आणि "ब्रीज टू इंडिया' या संस्थांनी केले. "रॅपिड हायरारकिअल मॅपिंग ऑफ रूफटॉप; तसेच थ्रीडी सिम्युलेशन ऑफ पॉइंट सॅम्पल' ही संशोधन पद्धती या अभ्यासासाठी वापरण्यात आली. मुंबईतील 12 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या 120 विद्यार्थ्यांनी संशोधनात भाग घेतला. 

Web Title: Mumbai's growing electricity demand could suffice solar energy