मुंबईचा ऐतिहासिक, पुरातन वारसा जपायला हवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

समीर सुर्वे
Thursday, 28 January 2021

मुंबईत चिरंतर स्वरुपाची नवनिर्मिती घडवून त्याचा आदर्श जगासमोर ठेवला पाहिजे.असे प्रतिपाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

मुंबई : मुंबईला ऐतिहासिक,पुरातन वारसा लाभला आहे. हा वारसा जपणे,तो पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. 125 वर्षांचा इतिहास असलेली महापालिका मुख्यालयाची इमारत पर्यटकांना पाहाता येणार आहे.ही अभिमानास्पद आहे. मुंबईत चिरंतर स्वरुपाची नवनिर्मिती घडवून त्याचा आदर्श जगासमोर ठेवला पाहिजे.असे प्रतिपाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

महानगर पालिका मुख्यालयातील हेरीटेज वॉक उपक्रमाला आज पासून सुरवात झाली.पालिकेचा गौरवशाली इतिहास या वास्तुतून समोर येणार आहे.तेव्हा या भिती काय बोलतात हे ऐकले पाहिजे.मुंबईत गड आहेत.१२५ वर्षाचा इतिहास असलेल्या अशा इमारती आहेत.हा वारसा जपला पाहिजे.असे ठाकरे यांनी नमुद केले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भाई जगताप, आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. तर, पुण्यातील येरवडा तुरुंगातही हेरीटेज वॉक प्रकल्प सुरु झाला आहे.त्याचा उल्लेख अजित पवार यांनी यावेळी केला.जुन्या तुरुंगाचाही इतिहास आहे.तेथे,आपल्या राष्ट्रनायकांनी तुरुंगवास भोगला आहे. तो इतिहासही लोकांना कळायला हवा असेही पवार यांनी नमुद केले.अशा प्रकारचा हेरीटेज वॉक सुरु करणारी मुंबई महानगर पालिका ही देशातील पहिली पालिका आहे. अशा शब्दात आयुक्तांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शहर बकाल होऊ देऊ नका
अजित पवार यांनी मुंबईचे कौतुक करताना हे शहर बकाल होऊ देऊ नका.असे सल्लाही महानगर पालिकेला दिला.आपल्यला कोणालाही वाऱ्यावर सोडायचे नाही.पण, अस्वच्छता, अनाधिकृत बांधकाम, पदपथावरील अतिक्रमण बंद व्हायला पाहिजे असा सल्ला पवार यांनी दिला.हेरीटेज वॉकला मराठी पर्यायी शब्दा शोेधणे गरजेचे आहे.मराठीपण आपणचं जपले पाहिजे.असे अजित पवार यांनी या वेळी नमुद केले.  

नाईट लाईफचे कौतुक
नाईट लाईफचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले,‘नाईट लाईफ ही संकल्पना आजच्या तरुण पिढीला आवडणारी आहे.ही आताची गरज आहे.त्यासाठी कायदा व सुव्यवस्था चांगला राहील हे पाहता येईल.अशा शब्दात पवार यांनी नाईट लाईफची पाठराखण केली.

सहकाऱ्यांमुळे संधी मिळाली
तेरा-चौदा वर्षाचा असताना महापौर निवडणुकीसाठी पहिल्यांदा या वास्तूत आलो होताे.गॅलरीत बसून सर्व नाट्य पाहिले होते.कधीही विचार केला नव्हता.मुख्यमंत्री म्हणून या वास्तूत येईल.पण,नव्या सहकार्यामुळे ही संधी मिळाली अशी स्तुती मुख्यमंत्रयांनी केली.

महापालिका मुख्यालयात हेरीटेज वॉक सुरु झाल्यावर ही स्वप्न पुर्ती असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमुद केले.आता न्यायालयात अशा प्रकारचा हेरीटेज वॉक सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.त्याच बरोबर गेट वे ऑफ इंडिया आणि वानखेडे स्टेडियम वर  असा उपक्रम सुरु काण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

Mumbai's historical, ancient heritage should be preserved Chief Minister Uddhav Thackeray

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbais historical, ancient heritage should be preserved Chief Minister Uddhav Thackeray