मुंब्रा बायपास दुरुस्ती रखडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीसाठी आणखी महिनाभर लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कामात अडथळा येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आणखी काही महिने शहरात वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम राहण्याची शक्‍यता आहे.

उरण जेएनपीटीहून मुंबई, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे; मात्र या मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मार्गावर दर पावसाळ्यात खड्डे पडतात. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर अपघाताचे सत्र सुरू होते. त्यातच हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गाच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. एप्रिलमध्ये होणारे काम अनेक कारणांमुळे पुढे ढकलले जात होते. सुरुवातीपासूनच या कामात खोडा निर्माण झाला होता. अखेर ७ मेपासून या बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. त्यावेळी दोन महिन्यांमध्ये बायपास दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले जात होते. तसेच २४ तास या दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते; मात्र पावसामुळे काही दिवसांपासून ठरलेल्या वेळेपेक्षा हे काम मागे पडत होते. पावसाने विश्रांती घेतली नसल्याने हे काम महिनाभर मागे पडणार आहे. 

पूल सुरू होण्यास प्रशासन महिनाभर लागत असल्याचे सांगत अाहे. मात्र, कामगार त्यासाठी आणखी दीड महिना जाऊ शकतो, असे सांगत आहेत. येथील स्लॅब हटवण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला पुलाच्या कामासाठी दोन महिने लागणार असल्याचे सांगितले जात होते; मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. या दुरुस्तीकामासाठी आणखी महिनाभर लागू शकतो.
- आशा जठाळ, विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Mumbra bypass will keep repairs