पालिका डॉक्‍टरांची कारकुनीतून सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - महापालिकेच्या डॉक्‍टरांची कारकुनीतून सुटका करण्यात आली आहे. वैद्यकीय विभागासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. हा अधिकारी प्रशासकीय कामकाज हाताळणार आहे. विभाग प्रमुख डॉक्‍टरांनी फक्त वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी सांभाळायची आहे. 

महापालिकेच्या पाच प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाते, आरोग्य संचालक, कार्यकारी आरोग्य अधिकारी, उपनगरी रुग्णालयाचे प्रमुख अधिष्ठाते यांना रुग्णालयाचे प्रशासकीय कामही करावे लागत होते. त्यात त्यांचा बराचसा वेळ जात होता. त्यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी सुनील धामणे यांची उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. पालिकेच्या वैद्यकीय सेवेच्या आस्थापन विभागाचे कामकाज ते पाहतील. 

Web Title: municipa doctor free