जनसुविधा व आर्थिक शिस्तीसाठी महापालिकांची बाँड उभारणी महत्त्वाची - योगी आदित्यनाथ

कृष्ण जोशी | Wednesday, 2 December 2020

महानगरपालिकांच्या कारभाराला आर्थिक शिस्त लागावी यासाठी महापालिकांकडून रोखे उभारणी करून त्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे व्यक्त केले. 

मुंबई ः महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी निधी संकलन तसेच महानगरपालिकांच्या कारभाराला आर्थिक शिस्त लागावी यासाठी महापालिकांकडून रोखे उभारणी करून त्यांची शेअर बाजारात नोंदणी करण्याचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतील, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे व्यक्त केले. 

हेही वाचा - कॅबचालकांच्या मनमानीला चाप! केंद्र सरकारची नवीन नियमावली

लखनऊ महापालिकेने उभारलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या रोख्यांची (बाँड) मुंबई शेअर बाजारात नोंदणी करण्याचा कार्यक्रम आज त्यांच्या अध्यक्षतेखालील समारंभात झाला, त्यावेळी ते बोलत होते. सव्वानऊ वाजता शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होतानाच पारंपारिक पद्धतीने घंटानाद करून या बाँडच्या खरेदीविक्रीचे व्यवहार सुरू करण्यात आले.

Advertising
Advertising

महापालिकांना आर्थिक शिस्त लागणे, तसेच पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी निधीउभारणी या महत्त्वाच्या बाबी असून त्यासाठी हा उपक्रम अन्य महापालिकांसाठी पथदर्शी ठरेल. त्यामुळे महापालिकांमध्ये नव्या युगाची सुरुवात होईल. यापुढे आग्रा, प्रयागराज, गाजियाबाद या महापालिकांचेही रोखे काढण्यात येणार असून लवकरच आपण गाजियाबाद महापालिकेच्या रोख्यांच्या नोंदणीसाठी पुन्हा येथे येऊ असेही योगी म्हणाले. 

हेही वाचा - वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी

उत्तर प्रदेशने इझ ऑफ डुईंग बिजनेस मध्ये दुसरा क्रमांक मिळवला असून पायाभूत सोयींसाठी बाजारातून निधी उभारण्यात रोखे हे महत्त्वाचे साधन आहे. यामुळे महापालिका स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतील, लोकांना सोयी मिळतील तसेच महानगरपालिकांच्या कारभारात आर्थिक शिस्त येईल. किंबहुना महापालिकांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल होण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे अन्य महापालिकांनीही याचे अनुकरण करावे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. यावेळी उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आशुतोष टंडन तसेच अन्य मंत्री व अधिकारी, लखनऊ च्या महापौर संयुक्ता भाटिया, मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Municipal bonds are important for public convenience and financial discipline Yogi Adityanath

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )