पालिका प्रशासनातर्फे लवकरच नेमणूक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

मुंबई - मुंबईत अनेक ठिकाणी नाल्यांचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्यानंतर पुन्हा नागरिक कचरा फेकतात. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने दर वर्षी थोड्या पावसानंतरही अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यामुळे नाल्यात कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा पालिका क्‍लीनअप मार्शलची नेमणूक करणार आहे. 

पावसाळा तोंडावर आला तरी अनेक नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. नाल्यातील कचरा साफ केल्यानंतरही नागरिक कचरा फेकत असल्याने 100 कोटी खर्चूनही कचऱ्याची समस्या सुटत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने त्यावर उपाययोजना म्हणून नाल्यांच्या ठिकाणी क्‍लीनअप मार्शल तैनात करणार आहेत. 15 दिवसांपासून मुंबईत नालेसफाईच्या कामांची विविध राजकीय पक्ष पाहणी करत आहेत. या पाहणीत नाले कचऱ्याने भरलेले असल्याचे दिसून आले. कंत्राटदार नाल्यांची योग्य प्रकारे सफाई करत नसल्याची टीका शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष करत आहेत. पावसाळापूर्व नालेसफाई सुरू असताना क्‍लीनअप मार्शल नेमल्यास नाल्यातील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वास पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

झोपडीधारकांना होणार दंड 
नाल्याच्या बाजूला असणारे बहुतांश झोपडीधारक नाल्यात कचरा फेकतात. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या आणि इतर न विरघळणाऱ्या वस्तूंचे प्रमाण मोठे आहे. नाल्याजवळच्या झोपडीधारकांवर आता क्‍लीनअप मार्शलची नजर असणार आहे. कचरा टाकल्यास दंड किती आकारायचा याचा निर्णय लवकरच होणार आहे. तातडीने निर्णय घेऊन त्याबाबत अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. 

Web Title: municipal cleanup Marshall will be appointed