महापालिकेवर कंत्राटदार मेहेरबान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मुंबई - महापालिकेवर कंत्राटदार मेहेरबान झाले आहेत. तब्बल 30 ते 35 टक्के कमी किमतीत उद्यान वाहतूक बेटांची देखभाल कंत्राटदार करणार आहेत. नऊ प्रभागांतील या देखभालीच्या कामासाठी महापालिकेने 81 कोटींचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र कंत्राटदार कमी किमतीत काम करणार असल्याने त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापालिका उद्यान, मैदान, रस्तादुभाजकांच्या देखभालीसाठी खासगी कंत्राटदार नियुक्त करते. यंदा अडीच वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट देताना पालिका बाजारभावाचा अंदाज घेऊन कंत्राटदाराची रक्कम ठरवते. त्यानुसार कंत्राट मागवले जाते; मात्र पालिकेने ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत काम करण्यास कंत्राटदार तयार झाले आहेत, तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
Web Title: Municipal Contractor