क्षयमुक्तीसाठी पालिकेची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

भारत सरकारच्या २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत या घोषणेच्या धर्तीवर महापालिकेने ‘मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल' योजना आखली आहे.

मुंबई ः  भारत सरकारच्या २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत या घोषणेच्या धर्तीवर महापालिकेने ‘मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल' योजना आखली असून, तसा कृती आराखडाही तयार केला आहे. या आराखड्याचे मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते पालिका मुख्यालयातील महापौर दालनात नुकतेच प्रकाशन झाले. 

पालिकेने २०१३ मध्ये ‘मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल’ घोषणा केली होती. २०२२ पर्यंत ‘क्षयमुक्त भारत’  या केंद्र सरकारच्या घोषणेच्या धर्तीवर पालिकेने २०१९-२० चा कृती आराखडा तयार करून, ‘क्षयमुक्त मुंबई’ योजना आखली आहे. हा आराखडा केंद्रीय क्षयरोग विभाग, राज्य क्षयरोग विभाग आणि इतर सहकारी यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये रोगप्रतिबंध आणि सर्व सुविधांचे बळकटीकरण यावर भर देण्यात आला आहे. या वेळी सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष हर्षला मोरे, नगरसेवक राजू पेडणेकर, तसेच अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त डॉ. अश्‍विनी जोशी, उपायुक्‍त सुनील धामणे, आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation plan for 'Mumbai Mission for TB Control'.