पलिकेचे विद्यार्थी गिरविणार गूगल क्लासरूममधून अभ्यासाचे धडे 

रजनीकांत साळवी
बुधवार, 4 एप्रिल 2018

पालिकेच्या ४९ शाळांमधून गूगल क्लासरूम सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे मालव यानि सांगितले. गूगल क्लासरूम मध्ये १५ क्रोम बुक्स आहेत ज्यामध्ये सर्व गूगल एप्लिकेशन स्टोर केले आहेत व् स्मार्ट प्रोजेक्टर मध्ये सर्व शैक्षणिक एप्लिकेशन बनविण्यात आले आहेत. 

मुंबई : युवा अन स्टोपेबल या स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारने प्रभादेवी महानगर पालिकेच्या शाळेत गूगल क्लासरूम सुरु करण्यात आले असून, इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणतीही क्षैक्षणिक माहिती गूगल क्लासरुमच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरविणे सोयीचे होणार आहे 

आतापर्यंत महापालिकेच्या 7 शाळांमधून गूगल क्लासरूम सुरु करण्यात आले असून त्याकरिता लागणारे प्रोजेक्टर व् १५ लैपटॉप मोफत देण्यात आले. संस्थेचे प्रशिक्षक वर्षभर शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संस्थेचे मालव व्यास यानि सांगितले. 

पालिकेच्या ४९ शाळांमधून गूगल क्लासरूम सुरु करण्याचा आमचा मानस असल्याचे मालव यानि सांगितले. गूगल क्लासरूम मध्ये १५ क्रोम बुक्स आहेत ज्यामध्ये सर्व गूगल एप्लिकेशन स्टोर केले आहेत व् स्मार्ट प्रोजेक्टर मध्ये सर्व शैक्षणिक एप्लिकेशन बनविण्यात आले आहेत. 

गूगल क्लासरूम प्रोजेक्टर एखाद्या फल्या प्रमाणे काम करते  त्यावर काहिही लिहू शकतो. हवे तेवढे पेजेस बनवू शकतो गणिततील प्रमेय असो किंवा आणखी काही ते. चुटकीसरशी सोडवू शकतो. सर्व शैक्षणिक माहिती याद्वारे मिळवू शकतो. शिक्षक ऑनलाइन परीक्षा घेवू शकतात व ऑनलाइन मार्क्स देखील देवू शकतात ऐसे मालव यांनी सांगितले.

Web Title: municipal corporation school student teach google classroom