कर थकवलेल्या मालमत्तांवर बडगा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

मोठे थकबाकीदार 
मोठ्या थकबाकीदारांमध्ये नॅशनल स्पोर्टस्‌ क्‍लब, अमीर पार्क्‍स अँड ऍम्युझमेंट प्रा.लि., एचडीआयएल, बॉम्बे डाईंग कंपनी, विधी रिएल्टर्स, सनशाईन बिल्डर्स, सनशाईन हाऊस किपींग इन्फ्रा, रघुलिला मेगा मॉल, वसुंधरा डेव्हलपर्स, भारत टिम्बर कार्पोरेशन, रॉयल पाम्स, कांती डेव्हलपर्स आदींचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्तांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती कर निर्धारण आणि संकलन खात्याने दिली. 

मुंबई - मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार 216 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्तांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी 25 मालमत्तांवर जप्तीची आणि 25 मालमत्तांवर पाणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेली जकात दोन वर्षांपूर्वी रद्द झाली. त्यामुळे मालमत्ता कर उत्पन्नाचा मुख्य स्रोत झाला आहे. मालमत्ता करातून 2018-19 मध्ये 3495 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. ही रक्कम 2017-18 मध्ये 5132 कोटी रुपये होती. थकबाकीदार मालमत्तांचे पाणी तोडणे आणि जप्तीचा समावेश आहे. 

देयके मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्‍यक आहे. त्याचे पालन न झाल्यास संबंधितांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे. मालमत्ता कर न भरल्यास "डिमांड लेटर' पाठवले जाते. पुढील टप्प्यात 21 दिवसांची अंतिम नोटीस दिली जाईल. त्यानंतर मालमत्ता सील करणे, जलजोडणी खंडित करणे, मालमत्ता जप्त करणे अशी कारवाई केली जाणार आहे. 

मोठे थकबाकीदार 
मोठ्या थकबाकीदारांमध्ये नॅशनल स्पोर्टस्‌ क्‍लब, अमीर पार्क्‍स अँड ऍम्युझमेंट प्रा.लि., एचडीआयएल, बॉम्बे डाईंग कंपनी, विधी रिएल्टर्स, सनशाईन बिल्डर्स, सनशाईन हाऊस किपींग इन्फ्रा, रघुलिला मेगा मॉल, वसुंधरा डेव्हलपर्स, भारत टिम्बर कार्पोरेशन, रॉयल पाम्स, कांती डेव्हलपर्स आदींचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्तांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती कर निर्धारण आणि संकलन खात्याने दिली. 

Web Title: Municipal Corporation seized on tax-exempted properties