महापालिका होणार कर्जमुक्त 

महापालिका होणार कर्जमुक्त 

नवी मुंबई - शहरातील विविध पायाभूत सुविधांकरिता महापालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घेतलेल्या कर्जाचे हप्ते मुदतीआधीच फेडण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिका कर्जमुक्त होणार आहे. मुदतपूर्व कर्ज फेडल्यामुळे बचत झालेली रक्कम शहरातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांना गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

महापालिकेने एमएमआरडीएकडून 568 कोटी 83 लाखांचे कर्ज घेतले आहे. पालिका आठ टक्के व्याजदराने त्याचे हप्ते फेडते. सद्यस्थितीत पालिकेकडे सुमारे दोन हजार कोटींच्या ठेवी असल्यामुळे कर्जाचे हप्ते मुदतीआधी फेडणे शक्‍य आहे. विशेष म्हणजे पालिकेला या ठेवींवर सात टक्के व्याजदर मिळत आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या पटलावर 31 जुलै 2018 पर्यंत 319 कोटी रुपये हप्ता आणि 31 ऑगस्ट 2018 पर्यंत 321 कोटी रुपयांचे हप्ता भरण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मुदतपूर्व कर्जाची परतफेड जुलै 2018 पर्यंत केल्यास महापालिकेचे 20 कोटींचे व्याज; तर ऑगस्ट 2018चा हप्ता भरल्यास 22 कोटी 22 लाख व्याज द्यावे लागणार आहे; परंतु त्याआधीच जुलै 2018मध्ये हप्ते भरल्यास 117 कोटी 80 लाख व ऑगस्ट 2018 पर्यंत हप्ते भरल्यास 115 कोटी 60 लाख रुपयांची बचत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते; परंतु पालिकेचे प्रकल्प अडचणीत येणार असल्याची शक्‍यता राष्ट्रवादी कॉंग्रेसने व्यक्त केल्याने मुदतीआधीच हप्त्यांची परतफेड करता आली नाही. आता पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला असता स्थायी समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 

- पालिकेने एमएमआरडीएकडून घेतलेले कर्ज : 568 कोटी 83 लाख 
- आतापर्यंत व्याजाने फेडलेले कर्ज : 123 कोटी 84 लाख 
- उर्वरित कर्ज फेडण्यासाठी प्रस्तावित रक्कम : 284 कोटी 66 लाख 

105 कोटींची बचत होणार 
पालिकेने घेतलेल्या कर्जावर 2026 पर्यंत 114 कोटी व्याज भरायचे आहे; मात्र जानेवारी 2019 पर्यंत कर्जाचे हप्ते भरले तर 105 कोटी 42 लाखांची बचत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com