महापालिका करणार नव्या सहा पुलांची उभारणी

महापालिका करणार नव्या सहा पुलांची उभारणी

मुंबई - महापालिकेने धोकादायक १५ पैकी पाच पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी नवे पूल बांधण्यात येणार आहेत. सीएसएमटीलगतच्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात येत आहे. तपासणीत १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले होते. 

पाच पूल पाडण्यासाठी महापालिका सुमारे २७ कोटी रुपये खर्च करणार असून, त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेने शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. त्या तपासणीत १८ पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावेळी अन्य पुलांच्या दुरुस्तीची शिफारस सल्लागाराने केली होती.

हिमालय पूल दुर्घटनेनंतर स्ट्रक्‍चरल ऑडिटबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. हिमालय पूल सुस्थितीत असल्याचे सांगून महापालिकेच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटरने किरकोळ दुरुस्तीची शिफारस केली होती. दुर्घटनेतून धडा घेत पालिकेने सर्व पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आतापर्यंत पश्‍चिम उपनगरातील १५७ आणि पूर्व उपनगरातील ६६ पुलांची तपासणी पूर्ण झाली असून, १५ पूल धोकादायक असल्याचे आढळले आहे. महापालिकेने शहरातील पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी निविदा मागवल्या आहेत. शहरातील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करणारी डी. डी. देसाई कंपनी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी दोषी ठरली आहे. त्यामुळे त्या कामासाठी नवीन सल्लागार कंपनीची नेमणूक केली जाणार आहे. गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान पाच पूल पाडण्यात येणार असून, सहा पुलांच्या बांधकामांसाठी निविदा काढल्या जातील. हे काम ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल. पुलांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करायचे आहे. गोरेगाव ते दहिसर स्थानकांदरम्यानचे अन्य सहा धोकादायक पूलही लवकरच पाडले जाणार आहेत.

पश्‍चिम उपनगरातील धोकादायक पूल 
हंस भुग्रा मार्ग, पाइपलाईन सर्व्हिस रोड, वालभाट नाला, विठ्ठल मंदिर इराणी वाडी, रगडापाडा, एसव्हीपी रोड कृष्णकुंज, आकुर्ली रोड, हनुमान नगर, ओशिवरा नाला, एसव्ही रोड, पिरामल नाला लिंक रोड, एसबीआय कॉलनी आणि रतन नगर ते दौलत नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com