महापौरांना नवी मुंबईची भुरळ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नवी मुंबई - महापालिकेच्या मुख्यालयाची विलोभनीय इमारत देशातील अन्य शहरांच्या महापौरांना भुरळ घालत आहे. काही महिन्यांत देशातील सात राज्यांमधील महापालिकांच्या महापौरांनी नवी मुंबईचा दौरा केला. त्यात त्यांच्यासोबत आलेले अधिकारी व नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयाला भेट दिल्यानंतर या वास्तूची तोंड भरून स्तुती केली. 

पाम बीच रोडशेजारी किल्ले गावठाणाजवळ 160 कोटींची नवी मुंबई महापालिका मुख्यालयाची भव्य आणि देखणी इमारत आहे. संसद भवनाच्या इमारतीपासून प्रेरणा घेऊन बांधलेल्या या इमारतीच्या सौंदर्यात भर टाकणारा गोल घुमट सर्वाधिक लोकप्रिय झाला आहे. आधाराविना तयार केलेल्या या घुमटाची दखल लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. मुख्यालयाशेजारी फडकणारा 225 फुटांचा प्रतीकात्मक राष्ट्रध्वज देशातील सर्वांत उंच व मोठा ध्वज ठरला आहे. विशेष म्हणजे, ही इमारत आगरोधक असल्याने ग्रीन बिल्डिंगचा राष्ट्रीय पुरस्कार मुख्यालयाला मिळाला आहे. नवी मुंबई शहराची पाहणी करण्यासाठी पंजाबमधील जालंदरचे महापौर सुनील ज्योती, छत्तीसगडमधील रायपूरचे महापौर प्रमोद दुबे, सिक्कमी गंगटोकचे महापौर शक्ती सिंग, मध्य प्रदेशमधील रेवाच्या महापौर ममता गुप्ता, लुधियानाचे महापौर हरचरन सिंग गोहलवाडिया, आंध्र प्रदेशमधील अनंतपूरचे महापौर एम. स्वरूपा, छत्तीसगडमधील बिलासपूरचे महापौर किशोर राय, मध्य प्रदेशमधील देवासचे महापौर सुभाष शर्मा, सिक्कीम गंगटोकचे आयुक्त शेवांग गायछो आदींनी नवी मुंबईला भेट देऊन पाहणी केली. या सर्वांनी मुख्यालयासह नवी मुंबईतील रस्ते, मलनिःसारण केंद्र, स्काडा यंत्रणेद्वारे पाणीपुरवठा अशा सोईसुविधांची माहिती जाणून घेतली. 

Web Title: Municipal Corporation's Mayor visited Navi Mumbai