महापालिकेच्या ई-बाईकची नागरिकांकडून मोडतोड

महापालिकेच्या ई-बाईकची नागरिकांकडून मोडतोड
महापालिकेच्या ई-बाईकची नागरिकांकडून मोडतोड

नवी मुंबई : वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्यांपासून सुटका करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने राबवलेल्या जन सायकल सहभागप्रणाली आणि ई-बाईक या पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या सायकली व्यवस्थित न हाताळल्याने पालिका क्षेत्रातून प्रतिदिन किमान ३० सायकली तुर्भे येथे दुरुस्तीसाठी पाठवण्यात येत आहेत.

नवी मुंबईतील सीवूड बेलापूर, नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, सानपाडा, तुर्भे आणि खारघर शहरात हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून वाहनतळ, वाहतूक कोंडीशिवाय प्रदूषणमुक्त शहर अशी नव्याने ओळख निर्माण करण्याचा नवी मुंबई मनपाचा संकल्प आहे. प्रत्येक स्थानकाच्या ठिकाणी किमान १५ अथवा मागणीनुसार सायकल पुरवठा करण्यात येतो. 

या सायकलींची दररोज पाहणी, स्वच्छता करण्यात येते. त्यांच्या विजेची बॅटऱ्या, त्यांच्या क्षमता तपासल्या जातात. मात्र, काही तरुण वापरकर्ते डबलसीट वाहन वापरतात. शिवाय वाहन हाताळताना काळजी न घेतल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सायकलींची चाके वाकडी होऊन त्यांच्या तारा तुटतात. सायकलिंगच्या बेरींगही खराब होतात. निष्काळजीने सायकल सुसाट चालवून रस्त्यावर अपघात होतात. तसेच जीपीएस यंत्रणेतील बॅटऱ्यांच्या प्रणाली खराब होणे किंवा त्यांची बांधणीतील सेटिंग बदलणे आदी प्रकार घडत आहेत. 

वर्षभरात ९० हजार नागरिकांकडून वापर
जनसायकल सहभाग प्रणाली व ई-बाईक या उपक्रमांत आतापर्यंत लाखो हौशी सायकलस्वारांनी सायकली चालवल्या. या शहरामधील ९० हजार नागरिकांनी एका वर्षात सुमारे आठ लाख ४० हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या मारल्या आहेत. त्यांनी केलेल्या परिक्रमातून १५ लाख तीन हजार किलोमीटर इतके अंतर पार पाडले. शिवाय यात ४५ टक्के महिलांनी सायकली फिरवल्या आहेत. प्रदूषणाच्या दृष्टीने विचार केल्यास २१ कोटी पाँईटस कार्बन क्रेंडीद्वारे प्राप्त झाल्याची युलू बाईक्‍स प्रा. लि.कडे नोंद झाली आहे, असे युलू सायकलचे ऑपरेटर मॅनेजर दीपक शर्मा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com