प्लास्टिक विक्रीतून पालिका करणार कमाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - बंदी घालण्यात आलेले प्लास्टिक जमा केल्यानंतर त्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते विकण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. हे प्लास्टिक पुनर्वापर करण्यायोग्य आहे का, याची खात्री करूनच ही विक्री होणार आहे. 

राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्याने नागरिक आणि लहान-मोठ्या दुकानदारांकडे असलेले प्लास्टिक गटारात आणि कचऱ्यात फेकले जाऊ नये, या हेतूने पालिकेने मुंबईत काही ठिकाणी प्लास्टिक जमा करण्यासाठी "बिन' उभारले आहेत. तेथे जमा होणारे प्लास्टिक डम्पिंग ग्राऊंडवर न टाकता त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. 

मुंबईत प्लास्टिकचा पुनर्वापर करणारे अनेक उद्योजक आहेत. त्यांना हे प्लास्टिक विकण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात मुंबईत 25 ठिकाणी प्लास्टिक बिन बसवण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. लवकरच या बिन्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. 

जमा होणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीतून पालिकेला फारच कमी उत्पन्न मिळणार आहे. मुळात उत्पन्न मिळवण्याचा हा या मागील हेतू नाही. प्लास्टिकचा पुनर्वापर होणे महत्त्वाचे आहे. हे प्लास्टिक विकत घेणारी व्यक्ती त्याचा योग्य पुनर्वापर करेल, याची खात्री करूनच ते विकले जाईल. 
- अजोय मेहता, आयुक्त, मुंबई पालिका 

असा होतो प्लास्टिकचा पुनर्वापर 
- प्लास्टिकचे लहान लहान तुकडे करण्यात येतात 
- त्यापासून दैनंदिन वापराच्या वस्तू बनवल्या जातात 
- काही ठिकाणी प्लास्टिकपासून तेलही काढले जाते 
- काही ठिकाणी डांबरात प्लास्टिक मिसळून रस्तेही बनवण्यात आले आहेत 

Web Title: The municipal earning from plastic sales