नऊ महापालिकांच्या रिक्त पदांसाठी 23 जूनला मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 मे 2019

उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली.

मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली.

पोटनिवडणुका होणारे महापालिकानिहाय प्रभाग : उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नवी मुंबई- 29, कल्याण-डोंबिवली- 26, पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), आणि 1अ, कोल्हापूर- 28 आणि 55, नाशिक- 10ड, मालेगाव- 6क, परभणी- 11अ आणि 3ड व चंद्रपूर- 6ब आणि 13ब.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal By-Election for Empty Post