पालिका विजेचे खांब बदलणार

पालिका विजेचे खांब बदलणार

नवी मुंबई - शहरातील रस्त्यावर लावलेले सिडकोकालीन विद्युत दिव्यांचे खांब बदलण्याचे काम अखेर सुरू झाले आहे. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. परिमंडळ एकमधील वाशी व नेरूळ विभागात हळूहळू खांब बदलण्यास सुरुवात केली आहे. सिडको प्रशासनाने २५ वर्षांपूर्वी (एमएस) माईल्ड स्टीलपासून तयार केलेले खांब उभारले होते; परंतु ते हवामानामुळे खराब झाल्याने त्याऐवजी महापालिकेने (गॅल्व्हनाईज्ड आयर्न) लोखंडी खांब बसवण्याचा याआधीच निर्णय घेतला आहे.

शहराच्या निर्मितीनंतर नागरिकांसाठी सिडकोने १९८० च्या दशकात रस्तेदुभाजक व पदपथांवर विजेच्या प्रकाशाकरिता स्टीलचे खांब उभारले होते; परंतु नवी मुंबईची हवा दमट व खारी असल्याने लोखंडी विद्युत खांब गंजून खराब झाले. तसेच पावसाळ्यात खांब रस्त्यावर एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे एकूण दोन हजार २३० खांब बदलण्याचा निर्णय दोन महिने आधीच घेतला होता; परंतु निवडणुका आल्याने हे काम धीम्या गतीने सुरू होते. नुकतेच परिमंडळ एकच्या कंत्राटदाराला कामाचे आदेश मिळाल्यानंतर वाशी व नेरूळ विभागात खांब बदलण्याच्या कामांनी वेग घेतला आहे. परिमंडळ एकमध्ये ७८० खांब बदलण्यात येणार आहेत.  सध्या वाशी रेल्वेस्थानक परिसरात खांब बदलण्याचे काम सुरू आहे. परिमंडळ एकमधील खांब बदलण्यासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च केला जाणार आहे. परिमंडळ दोनमधील कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र, सर्वाधिक खांब परिमंडळ दोनमध्येच बदलले जाणार आहेत. या भागात अंदाजे आठ कोटी रुपये खर्च करून एक हजार ४५० खांब बदलले जाणार आहेत. 

पाठपुराव्याला यश 
वाशीतील रस्त्यांवरील सडलेले विद्युत दिव्यांचे खांब बदलण्याची मागणी वाशीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत सामंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती; परंतु खांब आले नसल्याचे स्पष्टीकरण मिळाल्यावर त्यांनी अवर सचिव नवनाथ वाठ यांच्याशी पत्रव्यवहार केल्यावर २५० खांब वाशी विभागाकरीता उपलब्ध झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com