मनपा कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

उल्हासनगर - एका निलंबित कर्मचाऱ्याचा थकीत पगार मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या संजय पवार या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. उल्हासनगर महापालिकेत अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून संजय पवार हा कार्यरत होता. मनपाच्या एका निलंबित कर्मचाऱ्याचा थकीत पगार काढण्यासाठी पवार हा वारंवार लाच मागत होता. अखेर या गोष्टीला वैतागून तक्रारदाराने लाचलुचपत विभाग ठाणे यांच्याशी संपर्क साधून याविषयी तक्रार केली.

उल्हासनगर - एका निलंबित कर्मचाऱ्याचा थकीत पगार मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या संजय पवार या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. उल्हासनगर महापालिकेत अतिक्रमण विभागात लिपिक म्हणून संजय पवार हा कार्यरत होता. मनपाच्या एका निलंबित कर्मचाऱ्याचा थकीत पगार काढण्यासाठी पवार हा वारंवार लाच मागत होता. अखेर या गोष्टीला वैतागून तक्रारदाराने लाचलुचपत विभाग ठाणे यांच्याशी संपर्क साधून याविषयी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत आज दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर बोदडे, प्रशांत घोलप यांनी सापळा रचून संजय पवार याला रंगेहात पकडले. 

Web Title: Municipal employee was arrested while taking a bribe