विद्यार्थिनींच्या प्रोत्साहन भत्त्यात दुप्पट वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना यापुढे दुप्पट प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना आठवीनंतर पाच हजार रुपये भत्ता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. 

शाळांमध्ये मुलींची संख्या वाढविण्यासाठी पालिकेने 2007 पासून विद्यार्थिनींना प्रतिदिन एक रुपया भत्ता देण्याचा निर्णय घेतला. पहिलीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थिनीच्या नावावर एक हजारांची मुदत ठेव ठेवली जात होती. विद्यार्थिनीने सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना अडीच हजार रुपये मिळत होते. मात्र, ही रक्कम फारच कमी असल्याने त्यात पाच हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, सातवीऐवजी आठवी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. 

असा मिळणार भत्ता 
प्रवेश पूर्वी आता 
पहिलीपासून 2500 5000 
दुसरीपासून 2300 4400 
तिसरी पासून 2100 3800 
चौथीपासून 1400 3200 
पाचवीपासून 1100 2600 
सहावीपासून 800 2000 
सातवीपासून 500 1500 
आठवीपासून - 1000 

Web Title: municipal school Student promotion allowance doubled