पालिका शाळेतील मुलांची विमानतळ सफर

दीपक घरत
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पनवेल : पनवेल महापालिका व "द हिंदू ग्रुप' यांच्यातर्फे पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये शिकणा-या पन्नास विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.12) मुंबई आंतरदेशीय विमानतळाची सफर घडविण्यात आली.या सफरीत विमानतळ कसे असते,विमानांच्या उड्डाणांचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात येते तसेच प्रवासी प्रत्यक्षात कसा प्रवास करतात याची माहीती विंद्यार्थ्यांना देण्यात आली

पनवेल परिसरात आकार घेत असलेल्या नवी मुंबई विमानतळावरुण भविष्यात विमानाचे उड्डाण होणार आहे.विमानतळामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे या भागातील मुलांना विमानतळावर रोजगारविषयक संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याच्या द्रुष्टीने विंद्यार्थ्यांच्या मनात इच्छा निर्माण व्हावी म्हणून पालिका व "द हिंदू ग्रुप याच्यातर्फे हि सफर आयोजित केल्याची माहिती उपआयुक्त जमिर लेंगरेकर यांनी दिली. पालिका शाळेतील विद्यार्थी व पाच शिक्षक, उपायुक्त जमीर लेंगरेकर व सफरीचे आयोजक "द हिंदू ग्रुप'चे सदस्यही या वेळी उपस्थित होते.

Web Title: Municipal School Student visit to Airport