महापालिका शाळांमध्ये मिळणार सॅनेटरी नॅपकिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

स्थायी समितीत मंजुरी; 172 मशीन, दीड कोटी खर्च
मुंबई - महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी नॅपकिन मिळणार आहे. यासाठी 172 नॅपकिन वेंडिंग मशीनबरोबर नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी बर्निंग मशीनही बसविण्यात येणार आहे. हे नॅपकिन मोफत देण्यात येणार आहे. यासाठी पालिका सुमारे दीड कोटी खर्च करणार आहे. या प्रस्तावाला गुरुवारी (ता. 8) स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. नव्या वर्षापासून या वेडिंग मशीन सुरू होण्याची शक्‍यता आहे.

भारतात अवघ्या 12 टक्के महिला सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात, असे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. हे नॅपकिन उघड्यावर टाकल्यास चार सेकंदात एक लाख जीवाणू तयार होतात, असा दावा पालिकेने केला आहे. विद्यार्थिनींची वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य सुधारण्यासाठी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय पालिकेनी घेतला आहे. त्याबरोबर या नॅपकिन शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बर्निंग मशीनही बसविण्यात येणार आहे. या मशीनसह चार महिन्यांसाठी एक लाख 61 हजार नॅपकिनचा पुरवठा करण्यासाठी पालिका एक कोटी 52 लाख खर्च करणार आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहातही मशीन
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही अशा मशीन बसविण्याचा पालिकेचा विचार आहे; मात्र तेथे त्या माफक किमतीत विकत घ्याव्या लागतील. त्याबरोबर सार्वजनिक स्वच्छतागृहात या मशीनच्या सुरक्षेचाही प्रश्‍न असल्याने सध्या हा प्रस्ताव पालिकेने लांबणीवर टाकला आहे.

Web Title: Municipal schools will senetari Napkin