फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पालिका उपायुक्त जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

ठाणे - ठाण्यातील गावदेवी मैदान परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमणविरोधी पथकावर सुमारे दीडशे फेरीवाल्यांनी हल्ला केला. या घटनेत पालिका उपायुक्त संदीप माळवी जखमी झाले. त्यांच्या चेहऱ्याला तसेच नाकाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गावदेवी मैदान परिसरात रिक्षाचालक तसेच फेरीवाल्यांच्या उपद्रवाबाबत "सकाळ'ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यानंतर स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी "या भागातील फेरीवाल्यांना हटवा आणि बक्षीस मिळवा,' अशी घोषणाही केली होती. या पार्श्‍वभूमीवर पालिका उपायुक्त माळवी बुधवारी सायंकाळी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकासह त्या परिसरात गेले होते. त्या वेळी काही गुंड आणि फेरीवाल्यांनी या पथकाशी बाचाबाची करत त्यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: municipal sub commissioner injured by hockers attack