उघड्यावर मांस विकणाऱ्या 15 जणांवर गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी मुंबई - शहरात उघड्यावर जनावरांच्या कत्तली करून बेकायदा मांसविक्री करणाऱ्या 15 जणांवर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. यातील 6 जणांनी कारवाई करूनही पुन्हा बेकायदा व्यवसाय सुरू केल्याने संबंधितांवर दोन वेळा रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा मांसविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

नवी मुंबई - शहरात उघड्यावर जनावरांच्या कत्तली करून बेकायदा मांसविक्री करणाऱ्या 15 जणांवर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. यातील 6 जणांनी कारवाई करूनही पुन्हा बेकायदा व्यवसाय सुरू केल्याने संबंधितांवर दोन वेळा रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेच्या या धडक कारवाईमुळे बेकायदा मांसविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

नागरिकांना आहारात चांगल्या दर्जाचे मांस मिळणे, हा त्यांचा मानवी अधिकार असल्याने उच्च न्यायालयाने 9 ऑक्‍टोबर 2018 ला उघड्यावर जनावरांच्या कत्तली करण्याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 15 नोव्हेंबरला राज्य सरकारने सर्व महापालिकांना उघड्यावर जनावरांच्या कत्तली करणे व बेकायदा पद्धतीने मांसविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने अंमलबजावणी करून शहरात धडक कारवाई राबवली आहे. पदपथांवर बेकायदा पद्धतीने मांसविक्री व कत्तल करणाऱ्या 15 जणांच्या दुकानांवर कारवाई केली आहे. 29 नोव्हेंबरला ऐरोली, सेक्‍टर- 18 येथील मलनिःसारण वाहिनीशेजारच्या भिंतीला लागून बेकायदा पद्धतीने 3 जणांकडून मांसविक्री सुरू होती. तसेच ऐरोली, सेक्‍टर- 10 ए येथील डी-मार्टजवळच्या एलपीजी गोदामाजवळ मांसविक्री करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 200 कोंबड्या, एक जिवंत बकरा, मांस आणि पिंजरे असा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई करून झाल्यावर पशुवैद्यकीय विभागामार्फत संबंधितांवर रबाळे पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

दोन वेळा कारवाई 
ऐरोली, सेक्‍टर- 10 आणि 18 येथील सहा बेकायदा मांसविक्रेत्यांवर पशुवैद्यकीय विभागाने 29 नोव्हेंबरला कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर संबंधितांनी बस्तान मांडले होते; परंतु पालिकेने पुन्हा त्यांच्यावर रविवारी कारवाई करून कापलेल्या 16 बकऱ्यांची कातडी, दोन जिवंत बकरे असा एकूण 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या सहा जणांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांनी दिली. 

Web Title: Municipal veterinary departments have registered criminal cases against 15 people who have been illegally distributing meat