मुरबाड - विद्यार्थ्यांनी केले कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

मुरबाड - विद्यार्थ्यांनी केले कापडी पिशव्यांचे मोफत वाटप

मुरबाड - प्लास्टिक बंदीच्या मोहिमेला सहकार्य म्हणून जनसेवा शिक्षण मंडळ संचलित जयवंतराव पवार कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय टोकावडेच्या विद्यर्थ्यांनी टोकावडे गावात सोमवारी ता 24 जन जागृती रॅलीचे आयोजन केले टोकावडे बाजारपेठेत प्लस्टिकच्या पिशव्या घेऊन बाजारात आलेल्या लोकांकडून प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या व त्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले. 

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कापडी पिशव्याचे वाटप करताना लोकांना प्लटिक बंदीचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. राष्टीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम कार्यक्रम अधिकारी प्रा जितेंद्र तळेले व प्रा धनेश हरड यांनी आयोजित केला होता या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाविद्यालयात राष्टीय सेवा योजना विभागामार्फत एनएसएसचें ध्वजारोहण प्राचार्य अरविंद घुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com