विद्यार्थी हत्येतील आरोपीला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

मुरबाड - मुरबाडजवळ नांदेणी गावातील शालेय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी संशयित जयवंत भोईर याला मुरबाड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. त्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला वेळीच रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला. चौथीत शिकणाऱ्या सूरज भोईर (वय 9) या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून शाळेच्या आवारातच हत्या झाली होती. संशयित जयवंत भोईर याला मुरबाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निरी चिमाडा यांनी जेरबंद केले. जयवंत हा सूरजचा चुलत काका आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय मुरबाड बार असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे.
Web Title: murbad mumbai news criminal arrested in student murder case

टॅग्स