गुढीपाडव्याच्या दिवशी मुरबाडकरांना मिळाली हास्याची मेजवानी

मुरलीधर दळवी
सोमवार, 19 मार्च 2018

मुरबाडमध्ये कला गौरव या संस्थेने मुरबाड मधील नागरिकांना शाम भुर्के यांच्या व्याख्यानाद्वारे विनोदाची मेजवानी दिली व लोकांना पोटधरून हसायला लावले.

मुरबाड (ठाणे) - गुढी पाडव्याचा सण सर्वत्र आनंदात साजरा होतो. त्यासाठी शोभा यात्रा काढल्या जातात. घरामध्ये गोड पदार्थ आणून आनंद व्यक्त केला जातो. मुरबाडमध्ये या सर्व गोष्टी बरोबरच कला गौरव या संस्थेने मुरबाड मधील नागरिकांना शाम भुर्के यांच्या व्याख्यानाद्वारे विनोदाची मेजवानी दिली व लोकांना पोटधरून हसायला लावले. मुरबाड (ठाणे) मुरबाड येथील कलागौरव संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेत गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मुरबाडकरांना दोन तास हसवत ठेवून अनोखी मेजवानी देण्यात आली.

कला गौरव मुरबाड या संस्थे तर्फे रविवारी सायंकाळी विनोद मेजवानी या विषयावर साहित्यिक व व्याख्याते शाम भुर्के यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर घरातील डायनींग टेबल हास्याचे विद्यापीठ बनवा असा सल्ला शाम भुर्के यांनी दिला अध्यात्म व विनोद यांचा वापर करुन तणाव मुक्त जीवन जगता येते असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांना हसवत ठेवले.
सध्या संसारात जास्त तणाव आहेत. ते दूर करणेसाठी पंढरीच्या वारीत ज्ञानबा तुकाराम हे भजन म्हणताना वारकरी दोन पावले पुढे टाकतात व एक पाऊल मागे येतात. याचे उदाहरण देत एक पाऊल मागे घ्यायला शिका तुम्ही सुखी व्हाल असे पटवून सांगितले. जन्माच्या आनंदावर जसा विनोद होतो. तसाच मृत्यूच्या दुःखद घटनेवरही विनोद होतो हे सुद्धा दाखवून दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष वि. वा. यशवंतराव तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डी. के. खापरे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुरबाडचे नगराध्यक्ष मोहन सासे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ दळवी यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Murbadkar in Thane got a program on the day of gudhipadwa