esakal | अलिबागमध्ये वृद्धेची हत्या करून दागिने लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

अलिबागमध्ये वृद्धेची हत्या

घरात घुसून प्रभावती म्हात्रे (८६) या वृद्ध महिलेचा गळा दाबून ९० हजार रुपयांचे दागिने पळवण्यात आले. ही घटना आवास येथे शनिवारी (ता.३१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

अलिबागमध्ये वृद्धेची हत्या करून दागिने लुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग (बातमीदार) : घरात घुसून प्रभावती म्हात्रे (८६) या वृद्ध महिलेचा गळा दाबून ९० हजार रुपयांचे दागिने पळवण्यात आले. ही घटना आवास येथे शनिवारी (ता.३१) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असताना घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. 

प्रभावती म्हात्रे या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची दोन मुले मुंबईमध्ये राहत आहेत. पंढरीनाथ गुंजाळ यांना त्या मृत अवस्थेत दिसल्या. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. टीव्ही सुरू होता. या घटनेची माहिती त्यांनी मांडवा सागरी पोलिसांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात पाहणी केली असता, दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. प्रभावती म्हात्रे यांचा गळा दाबल्याचेही दिसले. घरातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

खून करून दागिने चोरण्यात आले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मांडवा सागरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके अधिक 
तपास करीत आहेत.

loading image
go to top