‘हजारेंना साक्षीदार करण्याची गरज नाही’

Court
Court

मुंबई - काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सरकारी पक्षाचे साक्षीदार म्हणून बोलावण्याचे निर्देश द्यावेत, या आशयाचा पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळला. हजारे यांच्या साक्षीची तसेच आनंदीदेवी यांच्या मागणीनुसार या खटल्यातील आरोपींचे जबाब नोंदवण्याची कार्यवाही पुढे ढकलण्याचीही गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

३ जून २००६ ला नवी मुंबईतील कळंबोली येथे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी राजकीय वैमनस्यातून पवनराजे यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोप आहे. हजारे यांनाही पद्मसिंह यांच्याकडून धमकी मिळाली होती. त्यामुळे पवनराजे यांच्या हत्येमागील उद्देशाबाबत ते सांगू शकतील, असे आनंदीदेवी यांचे म्हणणे होते. 

यापूर्वी सीबीआयने यासंदर्भात सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने आनंदीदेवी यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com