तब्बल पाच महिन्यांनंतर मृतदेहाचे गूढ उकलले

Police
Police

मुंबई - हत्या झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नवघर पोलिसांना पाच महिने लागले. यादरम्यान आरोपीने आणखी एकाच्या हत्येचा प्रयत्न केला; मात्र त्यातून बचावलेल्या व्यक्तीमुळे पहिल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या दोन्ही प्रकरणांतील आरोपी, मृत आणि जखमी व्यक्ती एकाच हॉटेलमध्ये काम करीत होते. जानेवारीत हत्या झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना तब्बल पाच महिने लागले. विजयकुमार यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलुंड पूर्वेतील केळकर महाविद्यालयाच्या इमारतीमागील झुडपात त्याचा मृतदेह आढळला होता. डोक्‍यात जड वस्तूने प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्याने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात विजयचा संपूर्ण चेहरा जळाल्याने त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश येत नव्हते. दरम्यान, एप्रिलमध्ये केळकर महाविद्यालयामागे त्याच ठिकाणी नवराज रेगमी (वय 30) याच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला. त्याचाच सहकारी योगेश राणे याने त्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी नवघर पोलिसांनी चेंबूर घाटला येथून योगेशला अटक केली होती. योगेश आणि नवराज मुलुंड पश्‍चिम रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलमध्ये कामाला होते. योगेश तिथे चहा बनवायचा; तर नवराज टेबलबॉय होता. याच हॉटेलमधील टेबलबॉय विजय जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे तपासात उघड झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com