चपात्या कमी दिल्याच्या रागातून मजुराचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

उल्हासनगर - जेवणाच्या ताटात दोन चपात्या कमी दिल्याच्या रागातून मजुराचा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी उल्हासनगरात घडला. मुकेश प्रताप राजपूत असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणातील मारेकरी फरार झाला आहे.

येथील विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथे काम करणारे मजूर पुलाखालीच एकत्र राहतात. मुकेश याने चपात्या बनवल्या; मात्र दोन चपात्या कमी पडल्याच्या वादातून एका मजुराने राजपूत याच्या डोक्‍यात दगड मारला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Murder Crime