Murder
Murder

चिमुरडीच्या खूनप्रकरणी एकास अटक

खोपोली (मुंबई) - अनैतिक संबंधास महिलेने विरोध केल्याच्या रागातून तिच्या चिमुरड्या मुलीची हत्या करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या प्रकरणातील आरोपीचे नाव पोलिसांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही; मात्र माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी खोपोली बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिकांनी बंद पाळून संताप व्यक्त केला. बुधवारी एका चार वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उजेडात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावला. तपासादरम्यान अटकेत घेतलेल्या आरोपीने महिलेने अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या रागातूनच आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com