प्रियकराने प्रेयसीची धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून केली हत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

विरारमध्ये विवाहबाह्य संबंधातून २७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घरातच प्रियकराने धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून हत्या केली. सोसायटीच्या सीसी टीव्हीच्या आधारे २४ तासांत विरार पोलिसांनी हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे.

नालासोपारा - विरारमध्ये विवाहबाह्य संबंधातून २७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घरातच प्रियकराने धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून हत्या केली. सोसायटीच्या सीसी टीव्हीच्या आधारे २४ तासांत विरार पोलिसांनी हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे.

मयुरी मोरे (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, अमोल गणपत औदारे असे आरोपीचे नाव आहे. तिचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना मूलबाळ झाले नव्हते. मृत आणि आरोपी हे दोघेही बोरिवलीत इमिटेशन ज्वेलरीच्या कंपनीमध्ये काम करत होते. मयुरीचा पतीही खासगी कंपनीत काम करतो. मयुरीचे वर्षभरापासून आरोपी अमोलसोबत प्रेमसंबंध होते. मयुरीचे पुन्हा एकाशी प्रेमसंबंध जुळल्याने तिने अमोलला संबंध तोडण्यास सांगितले. याचाच राग मनात धरून त्याने धारदार हत्याराने मयुरीवर वार केले. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरातच सोडून प्रियकर फरार झाला होता. 

२८ एप्रिलला सायंकाळी महिलेचा पती गावावरून आल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Crime