चोरी लपवण्यासाठी केली हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

ठाणे: चोरीचे बिंग फुटू नये म्हणून भंगारचोरांनी भंगारवाल्याचीच हत्या केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती. डायघर, उत्तरशिव येथे घडलेल्या या घटनेनंतर चार महिन्यांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून धागेदोरे हाती लागल्याने या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार, शिळ-डायघर पोलिसांनी (युपी) उत्तर प्रदेशातून त्रिकुटाला अटक केली असून एकजण फरार आहे. अटक आरोपींना ठाणे न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

शिळ-डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उत्तरशिव येथे 10 एप्रिलला रात्रीच्या सुमारास भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या जमील ऊर्फ अंग्रेज नशिबदार खान (26) रा. शिबलीनगर, शिळ फाटा याची झोपेतच अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. घटनास्थळी कोणताही पुरावा आढळला नसल्याने चार महिन्यांपासून पोलिस हत्येचा तपास करीत होते. पोलिसांनी मृतकाची कौटुंबिक पार्श्वभूमी, घरगुती भांडणे, प्रेमप्रकरण आदी सर्व बाबी तपासूनही कोणतेही धागेदोरे हाती लागत नव्हते. अखेर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. 

उत्तरशिव येथील भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या मृतक जमील ऊर्फ अंग्रेज खान याने ट्रकमध्ये भंगार भरताना भंगार चोरी केली जात असल्याचे पाहिले होते. त्यामुळे आपली चोरी पकडली जाण्याच्या भीतीने भंगार भरणारे जगनारायण वर्मा ऊर्फ जंगली (29), नंदराम वर्मा (23), प्रमोदकुमार वर्मा (23) आणि बडकाऊ पासवान (32) यांनी जमील गाढ झोपेत असताना त्याची हत्या केली.
 
Web Title: murder due to hide theft