मोहम्मद अली रोडवर ज्येष्ठ नागरिकाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - मोहम्मद अली रोड परिसरात ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली. इक्‍बाल दर्वेश (वय 72) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना हात-पाय बांधून काठीने मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. इस्माईल मोहल्ल्यातील "साई मंजिल'मध्ये ही घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर राहणारे इक्‍बाल दुकानात न गेल्याने त्यांचा नातू घरी गेला, तेव्हा हा प्रकार उघड झाला. घरातील काही साहित्य चोरीला गेले आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरण पाहून तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: murder on mohammad ali road