जुगारातील पैशांच्या वादातून मित्राची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - जुगारात हरलेले पैसे परत देण्याच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. विकी खैरे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी वाजिद खानला कल्याण रेल्वेस्थानकावरून अटक केल्याचे उल्हासनगर गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील शांतीनगर परिसरात काही जण सोमवारी (ता. 23) सायंकाळी जुगार खेळत होते. वाजिद हा पैसे हरला होता. त्याने विकी खैरे याच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. विकीने वाजिदला उत्तर प्रदेशात येऊन ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे संतापलेल्या वाजिदने त्याच्याकडील सुऱ्याने विकीच्या गळ्यावर आणि छातीवर वार केले. त्यात विकी जागीच ठार झाला.

Web Title: murder in money dispute crime