आईसह चार वर्षाच्या चिमुरडीचा गळा चिरून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

मुंबई - धारावी परिसरातील शाहू नगर येथील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचा तसेच तिच्या चार वर्षांच्या मुलीचा अज्ञात व्यक्तींनी गळा चिरून खून केल्याची घटना गुरुवारी उघड झाली. खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.  

धारावीतील डायमंड अपार्टमेंटमध्ये रियाज हुसेन सय्यद हे पत्नी तेहसिन (३४), मुलगी आलिया ऊर्फ फातिमा यांच्यासह राहत होते. गुरुवारी सकाळी तेहसीन आणि फातिमाचा अज्ञात व्यक्तींनी खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. हे खून कुणी व का केले, याचा तपास पोलिस करत आहेत. 

या हत्येमागे तेहसिनचा पती रियाज असल्याचा पोलिसांचा कयास आहे.  दरम्यान, या प्रकरणी  शाहू नगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत  असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी सांगितले.

Web Title: Murder Mother Child Crime