वडिलांच्या चाकूने घेतला मुलीचा जीव!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - आपल्या माणसाला मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जावे आणि आपल्याच हातून त्याचा मृत्यू व्हावा, असा विरळा प्रकार सोमवारी (ता. 27) गोरेगावमध्ये घडला.

गोरेगावच्या मोतीलाल नगर क्रमांक एकमध्ये श्रावस्ती बुद्धविहारापाशी राहणारे राजेश आगवणे आपल्या मुलीला- मेघनाला वाचवण्यासाठी चाकू घेऊन धावले; पण शेजाऱ्यांनी मेघनाला त्यांच्या अंगावर ढकलले आणि त्यांच्या हातातील चाकूने 17 वर्षांच्या मेघनाचा जीव घेतला.

मेघना आगवणे आणि त्यांच्या शेजारी मंदा घोडेराव यांच्यात सांडपाण्यावरून वाद झाला. तो इतका विकोपाला गेला की, घोडेराव यांच्या पतीने अन्य महिलांसह मेघनाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला वाचवण्यासाठी तिचे वडील राजेश चाकू घेऊन धावून गेले. त्या वेळी मेघनाला मारहाण करणाऱ्यांनी तिला राजेश यांच्या अंगावर ढकलले. त्यामुळे त्यांच्या हातातील चाकूचे वार मेघनावर झाले. तिला सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्‍टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मेघनाची बहीण पूजाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मेघनाचे वडील राजेश आगवणे यांच्यासह मंदा घोडेराव, त्यांचा पती सुभाष घोडेराव, पिंकी, स्विटी, शीतल, प्रिया यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: murder in mumbai