
Crime News : आईची हत्या... आरोपी मुलगी रिंपल जैनला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात आईची हत्या प्रकरणी आरोपी मुलगी रिंपल जैनला मुंबईतील न्यायलयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रिंपल जैनवर आपल्या आईची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी रिंपल जैनला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती. हत्येमागे नेमके काय कारण आहे याचा काळाचौकी पोलीस तपास करत आहे.
मृत महिलेचे बंधूंनी आपल्या गेले अनेक दिवस बहिणीशी संपर्क न झाल्याने पोलिसात 14 मार्चला तक्रार दाखल केली होती. महिलेच्या भावाने तिच्या मुलीकडे वारंवार चौकशी करून सुद्धा प्रत्येक वेळी नवीन नवीन करणे देण्यात आली .
अखेर कंटाळून स्थानिक काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस पथक चौकशी करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 14 मार्चला महिलेच्या घरी पोहोचले. पोलिसांनी मुलगी रिंपल जैनशी चौकशी केली असता तिने पोलिसाना उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच घरात पोलिसाना दुर्गंधी आढळली.
दुर्गंधी मुळे पोलिसांचा संशय बळावला. घरात तपासणी केल्यावर राहत्या घरातील कपाटात प्लास्टिक पिशवीत बांधलेल्या अवस्थेत मृतदेह तुकड्या तुकड्यात मिळून आला. काळाचौकी पोलीसानी मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी तिचा मृतदेह कपाटात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीतून बाहेर काढला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता. एवढेच नाही तर महिलेच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, हात पाय असे शरीराचे अनेक तुकडे करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा फॉरेन्सिकच्या पथकाला पाचारण करून संपूर्ण घराचा पंचनामा करण्यात आला.हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.